निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष
माळेगाव – पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालकपदी अजित पवारांचे निकटवर्तीय रणजित तावरे यांची निवड झाल्याने जेसीबीने गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी करीत माळेगावात एकच जल्लोष करण्यात आला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याने माळेगावकरांनी एकच जल्लोष केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संचालक कोण होणार, या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
अजित पवारांचे निकटवर्तीय रणजित तावरे यांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालकपदी तावरे यांची निवड झाल्याने माळेगावकरांनी जल्लोष केला.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल, याकडे लक्ष होते. राजकीय पार्श्वभूमी विचारात न घेता अजित पवार यांनी तावरे कुटुंबीयांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. त्या संधीचे सोने करून बॅंकेमार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल.
– रणजित अशोकराव तावरे, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक.