अमित बेनके :जुन्नर तहसील कार्यालयात शासकीय कागदपत्रे वाटप
जुन्नर – आदिवासी कातकरी ठाकर समाज हा कष्टकरी असून शेतकर्यांच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारा; परंतु वंचित राहिलेला समाज आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणण्याकरिता शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
त्यांच्याकडे पुरावे नसल्याने शासकीय लाभांपासून वंचित असलेल्या या समाजबांधवांना शासकीय लाभदायी योजनांचा लाभ मिळून देण्याकरिता आमदार अतुल बेनके यांच्या सूचनेनुसार विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रेशन कार्ड, जातीचे दाखले, आधारकार्ड तयार करून त्यांना देण्यात येत असल्याची माहिती युवा नेते अमित बेनके यांनी दिली.
आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव, जुन्नर तहसील कार्यालय, गोळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मागील महिन्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी पात्र लाभार्थिंकडून त्यांच्या विविध कामांकरिता कागदपत्रे जमा करण्यात आली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेले जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्डचे वाटप शनिवारी (दि. 23) जुन्नर तहसील कार्यालयात करण्यात आले होते,
त्यावेळी अमित बेनके बोलत होते. यावेळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, वल्लभ पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब कुंभार, अजिंक्य घोलप, हर्षल जाधव, नितीन शेडगे, राजू मुकणे, दगडू वाघ आदींसह आदिम संगटनेचे पदाधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.
जुन्नर : पात्र लाभार्थींना विविध दाखले , रेशनकार्ड वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवर व लाभार्थी.