सासवड – गेली 40 वर्षे सासवड नगरपालिकेत सत्ता असणार्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना देखील सासवड शहर भाजपकडून विकासकामे केली जात आहेत, असे पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सांगितले.
जेजुरी रोड ते कडबान वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (30 लाख 33 हजार 316), जुना सुपे रोड ते कोकणजाई रस्ता म्हेत्रे मळा डांबरीकरण करणे (12 लाख 6 हजार 67), चंद्रशेखर जगताप घर ते शितोळे घर (थडा) पेव्हिंग ब्लॉक बसविणे म्हागावकर घर ते बांदल आळी पर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बांदल घर ते सोंडकर घर कुंजीरवाडा पाठीमागे पेव्हिंग ब्लॉक बसविणे. (20 लाख 36 हजार 174), कमळेश्वर घाट ते विर फाटा रोड डांबरीकरण करणे (44 लाख 3 हजार 278), भैरवनाथ सोसायटी आंबोडी रस्ता डांबरीकरण करणे (8 लाख 82 हजार 731), पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस ते राजेंद्र गिरमे व सूर्यवंशी घर पारगाव रोड रस्ता डांबरीकरण करणे (85 लाख 5 हजार 327) या रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी टेकवडे बोलत होते.
यावेळी सासवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष साकेत जगताप, सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप, गणेश मेमाणे, मिलिंद इनामके, अॅड. नितीन कुंजीर, सचिन राऊत, दिलीप गिरमे, डॉ. राजेश दळवी, शलिल जगताप, जालिंदर जगताप, गिरीश जगताप, भारत चौखंडे, जयेंद्र निकम, मयुर जगताप, नदिम ईनामदार, आनंद जगताप, समीर कामत उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष प्रदीप गिरमे म्हणाले की, गेल्या 41 वर्षांमध्ये या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा निधी खर्च करण्यात आला नाही.
हा भाग वाढीव हद्दीमध्ये असून या रस्त्यावरून अनेक लोक जात असतात; परंतु या रस्त्यामुळे काही लोकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. तुमच्या विचाराशी काहींचे जवळीक नसेल; परंतु ज्यांची जवळीक आहे ते सुद्धा याच रस्त्याने जातात त्यामुळे कोणासही वेठीस धरू नये, त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनीही मत व्यक्त केले.
निधी कमी पडणार नाही
सासवड नगरपालिका नगरपालिकेमध्ये विविध विकासकामे करण्याचा प्रयत्न सासवड शहर भाजपकडून होत आहे. नगरविकास खाते हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार हे असल्याने सासवडला कोणत्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिले.
“भाजपाच्या वतीने आम्ही कामे मंजूर करून आणली असून याचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कामासाठी आम्ही सातत्याने तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.” – साकेत जगताप, माजी अध्यक्ष, सासवड शहर