दावडी – निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे चंपाष्ष्ठी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गडावर सदानंदाचा येळकोट येळकोट, जय मल्हारचा जयघोष करत दर्शनबारीतून भाविकांनी कुलदेवताचे दर्शन घेतले.
निमगाव गडावर चंपाशष्ठीचा सण भंडारार्याची उधळण करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलदैवताचा चंपाषष्ठीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने कुलदैवत असलेल्या मल्हार मार्तंड खंडोबा देवाच्या गडावर जागरण- गोंधळ करुन कुलदैवताचे देवकार्य करण्यासाठी भाविकानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
यामध्ये नव्याने विवाहबद्ध झालेली जोडपी मोठ्या संख्येने होती. चंपाषष्ठी निमित्तांने निमगाव खंडोबा येथे दिवसभर उत्तर पुणे व अहमदनगर, ठाणे, पुणे येथुन हजारो भाविकांनी येवून तळी भंडार भरत होते.