डोणजे येथे प्रात्यक्षिके, खडकवासला येथे रोड मार्च पार
खडकवासला – गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी डोणजे व खडकवासला येथे बुधवारी (दि. 13) हवेली पोलिसांनी दंगा काबू योजनासह बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. हवेली, वेल्हे, पौड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जवान, होमगार्ड असे पन्नासहून अधिक कर्मचारी अधिकारी यात सहभागी होते.
हवेली भागाचे विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी मार्गदर्शन केले. आगामी येणारे गणेश उत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दंगा काबू योजना तातडीने कशी राबवण्यात यावी, यासाठी प्रात्यक्षिके करण्यात आली. डोणजे येथे मोकळ्या मैदानात प्रात्यक्षिके घेतल्यानंतर खडकवासला येथे रोड मार्च पार पडला.
खडकवासला, नांदेड, किरकटवाडी येथे सर्वाधिक गणेश मंडळे आहेत. तर आंबी सोनापूर, खानापूर, खामगाव मावळ, डोणजे, मालखेड, वरदाडे, गोऱ्हे बु. आदि गावात संख्या कमी आहे.
-संतोष भापकर, अंमलदार हवेली पोलीस स्टेशन ग्रामीण