मंचर -आंबेगाव तालुक्यामधील मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मंगळवार, दि. 30 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अभिलेख्यांची तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी शिबिराचे आयोजन सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केले आहे. 30 जानेवारी रोजी निरगुडसर येथे मेंगडेवाडी, निरगुडसर गावातील नागरिकांसाठी शिबिर होणार आहे. 1 फेब्रुवारीला जवळे येथे नागापूर, भराडी, जवळे. 5 फेब्रुवारीला लोणी येथे खडकवाडी, वडगाव पीर, लोणी, मांदळेवाडी. 7 फेब्रुवारीला धामणी येथे पहाडदरा, जारकवाडी, धामणी.
9 फेब्रुवारीला पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे पोंदेवाडी व पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक. 12 फेब्रुवारीला अवसरी बुद्रुक येथे टाव्हरेवाडी, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक. 14 फेब्रुवारीला अवसरी खुर्द येथे भोरवाडी, तांबडेमळा, अवसरी खुर्द, खडकमळा, वायाळमळा. 16 फेब्रुवारीला पेठ येथे श्रीरामनगर, पेठ. 20 फेब्रुवारी रोजी घोडेगाव येथे काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी व घोडेगाव. 22 फेब्रुवारी चिंचोली, गिरवली, चास, चिंचोली, येथील नागरिक शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.
संबंधित शिबिराचे ठिकाणी मंडल अधिकारी, तलाठी, आपले सरकार केंद्र चालक उपस्थित राहणार असून अर्ज भरून घेणे, कागदपत्रे प्राप्त करून घेणे, प्रतिज्ञापत्र करून घेणे व इतर आवश्यक ती कामे करून प्रकरणे परिपूर्ण तयार करणार असल्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले.