बलवंत मांडगे : धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
मंचर: ग्रामीण भागातील पतसंस्थानी सहकार कायदा आणि स्वयंशिस्तीचे पालन केल्यास सहकार चळवळीला उज्ज्वल भविष्य आहे. सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने विश्वस्तांची भूमिका पार पाडून सभासदांचे हित जपावे, असे प्रतिपादन मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या 2024 च्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन मांडगे बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष सिताराम लोंढे होते.यावेळी उपाध्यक्ष सुनिल बाणखेले, जेष्ठ संचालक मंगेश बाणखेले, पुरुषोत्तम पटेल,सुदाम बेंडे, दिलीप महाजन, मनिष ठक्कर, पप्पुशेठ थोरात, बाबाजी इंदोरे, अश्विनी शेटे, अनिता निघोट उपस्थित होते. यावेळी मांडगे म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम सहकारी पतसंस्था करतात. सामान्य माणसाचे प्रथम प्राधान्य पतसंस्था हेच असल्याने संचालक मंडळाने जबाबदारीने काम करुन पतसंस्था चळवळ मजबूत करावी.
यावेळी सभासदांच्या वतीने पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर लोंढे म्हणाले, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संचालक मंडळ उत्कृष्ट काम करत असून पतसंस्थेची झालेली सर्वांगीण प्रगती हे त्याचे निदर्शक आहे.
याप्रसंगी पतसंस्थेचे सभासद अरुण लोंढे, रंगनाथ थोरात, गणेश खानदेशे, ॲड. बाळासाहेब बाणखेले, दत्तात्रय बाणखेले, राजाराम निघोट, नारायण कामठे, पांडुरंग बाणखेले, आत्माराम थोरात उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्य कार्याधिकारी अमित चिखले यांनी केले. उपाध्यक्ष सुनिल बाणखेले यांनी आभार मानले.