उपाध्यक्षपदी हरीभाऊ पवार
सविंदणे – सविंदणे (ता. शिरूर) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरूणकुमार ज्ञानेश्वर मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ नाना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष संभाजी पडवळ व उपाध्यक्ष जनाबाई किसन पडवळ यांनी राजीनामा दिल्याने सोसायटीच्या कार्यालयात निवड प्रक्रिया सहायक निंबधक अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लिपिक सरकारी संस्था ए. एस. धायगुडे, सचिव रघुनाथ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच वसंत पडवळ, राष्ट्रवादी कॉग्रेस युवकचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, संचालक रामदास पडवळ, संभाजी पडवळ, कैलास किठे, हरीभाऊ पवार, निलेश मिंडे, माणिक नरवडे, भाऊसाहेब पडवळ, बाळासाहेब पडवळ, बाळासाहेब लंघे, नवनाथ लंघे, शोभा लंघे, सरपंच शुभांगी पडवळ, उपसरंपच नंदा पुंडे, माजी उपसरंपच भाऊसाहेब लंघे, भोलेनाथ पडवळ, ईश्वर पडवळ, फुलाजी लंघे, जितेश पवार, बाळू पवार, बाळासाहेब पडवळ, दगडू पडवळ,
दत्तात्रय नरवडे, पोपट शिंदे, जयदीप लंघे, मयूर कोळेकर, गणेश कोळेकर, विकास गाजरे, वैभव शेलार, धोंडीभाऊ गावडे, जयकुमार मोटे, प्रकाश मेचे, महादू पोखरकर, फाकटे गावचे सरपंच शंकर पिंगळे, मनीष बोऱ्हाडे, बाबाजी बोऱ्हाडे, भिमाजी कांदळकर, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष मोटे व उपाध्यक्ष पवार यांचा माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे, डॉ. सुभाष पोकळे, दामूआण्णा घोडे, ग्रामस्थ याच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
निवडीनंतर अध्यक्ष मोटे, उपाध्यक्ष पवार म्हणाले की, सर्व संचालकांच्या समन्वयातून संस्थेचा सभासद हा केंद्रबिंदू मानून पारदर्शक कारभार करणार आहे. तसेच त्यांच्या उन्नतीसाठी संस्था कटिबद्ध राहणार आहे.