बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौर्यावर असताना त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वेळ देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रत्येय ते बारामतीच्या दौर्यावर असताना आला. विकास कामांची पाहणी करत असताना कार्यकर्ते सिद्धनाथ भोकरे यांनी अजित पवार यांना दुपारच्या जेवणासाठी आग्रह केला. निमंत्रणाच स्वीकार करत त्यांनी भोकरे कुटुंबीयांच्या घरी स्नेहभोजन केले. त्यांच्या समवेत बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव हे देखील होते. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी दादांनी येऊन स्नेहभोजन केल्याने भोकरे कुटुंबीय भरवले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामतीच्या दौर्यावर होते. शहरातील विविध विकास कामांची पाहणी ते करत होते. कार्यकर्त्यांचा लवाजमा तसेच अधिकारी त्यांच्यासोबत होते. विकास कामांची पाहणी करून झाल्यानंतर भोई समाजातील हे सिद्धनाथ रमेश भोकरे यांनी अजित पवार यांना जेवणाचा आग्रह केला.
एक तासात समोरील कार्यक्रम संपला की तुझ्या घरी जेवायला येतो असे अजित पवार यांनी सांगितले. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार यांनी भोकरे कुटुंबीयांच्या घरी स्नेहभोजन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी सर्वसामान्य जनतेच्या घरी जेवणाची स्टंटबाजी करीत असतात. त्याचे प्रदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून करत असतात. मात्र कोणती निवडणूक नसताना केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यावरच्या प्रेमापोटी अजित दादांनी माझ्या निमंत्रणाचा मान राखत आमच्या घरी स्नेहभोजन केले. परिसरातील नागरिक तसेच माझ्या कुटुंबियांशी चर्चा केली. प्रभागातील प्रश्न समजून घेतले. आकाश मोरे या छोट्या व्यावसायिकाचा घराचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला.
– सिद्धनाथ भोकरे, बारामती