मंचर –कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी हरिदास मारुती मते यांची आणि उपाध्यक्षपदी रामदास सोनू तोत्रे यांची बिनविरोध निवड मंचर येथे करण्यात आली.
नवनिर्वाचिताचा सन्मान मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कुरवंडी गावचे उपसरपंच जितेंद्र तोत्रे, माजी उपसरपंच विकास बारवे,
माजी अध्यक्ष दिलीप तोत्रे, रोहिदास तोत्रे, रोहिदास बारवे, तुषार तोत्रे, सुशील कदम, विराज वाघमारे, बाळासाहेब तोत्रे, विशाल तोत्रे, बन्सीलाल तोत्रे, बन्सीलाल गटे, बाबाजी जाधव, सीताबाई बेंगडे उपस्थित होते.