काँग्रेस, भाजपसह सर्वांनाच आठवले गटाचा दे धक्का! ‘या’ गावात दणदणीत विजय

सोलापूर –  महाविकास आघाडीत आणि भाजपच्या दोन गटात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात चुरशीच्या लढती होत आहे. पण अशातच अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआयने सर्वांना दे धक्का दिला आहे. 

अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचयातीत रामदास आठवलेंच्या आरपीआयचा दणदणीत विजय झाला आहे. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्यासमवेत पूर्ण पॅनल विजयी झाले. ७ पैकी ७ जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात एकूण ६५७  ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत ५८७  ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.