पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धामध्ये मुस्लीम समाजाच्या हत्याकांडाचा नोंदवला निषेध
जुन्नर – पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धामध्ये इस्रायलकडून मुस्लीम समाजाचे निर्दयी व अमानुष पद्धतीने होत असलेल्या हत्याकांडाचा तसेच अन्नपाण्यावाचून हालअपेष्टा करून मुस्लीम समाजावर होत असलेल्या अत्याचार अन्याचा जाहीर निषेध करण्यात आला. याविरोधात जुन्नरमधील शिया, सुन्नी मुस्लीम समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता.
जुन्नर शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेल्या या महा मोर्चाची सांगता अंजूमन हायस्कूलमध्ये सामूहिक दुवा पठण करून करण्यात आली. तसेच यावेळी इस्रायल देशात तयार होणारी विविध उत्पादने यापुढे कोणीही वापरू नयेत त्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
इस्रायलमध्ये मुस्लीम समाजावर होणाऱ्या अन्यायाचा यावेळी उपस्थित शिया, सुन्नी मुस्लीम समाजाकडून जाहीर निषेध केला. जुन्नर मुस्लीम संघटना,
अंजूमन ए मूर्तजवी शिया अशना अशरी जमाअत इत्तेहाद ए कौमी मुव्हमेंट या संघटनांतर्फे आयोजित महा मोर्चामध्ये जुन्नर तालुक्यातील सर्व मशिदींचे मौलानांसह समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.