राजगुरूनगर – खेड तालुक्यातील कुपोषित 274 बालकांच्या तपासणीतून जीवनसत्वाचा अभाव असणारी 190, जन्मदोष असणारी 10, त्वचारोग 4, डोळेदोष 10, दंतरोगाचे 1, आणि इतर आजार असणारी 57 मुले आढळून आली आहेत.
पुणे जिल्हा परीषदेच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यातील अगंणवाडीमार्फत शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची आरोग्य यत्रंणेमार्फत आरोग्य तपासण्या करून ऑनलाइन सर्व माहिती जमा करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषित बालकांसह सॅममॅम गटातील बालकांचा कुपोषणाची माहिती समोर आली आहे.
खेड तालुक्यात बाल आरोग्य ट्रॅकिंग प्रणाली (लहळश्रव कशरश्रींह ढीरलज्ञळपस ीूींशा) मधील 0 ते 6 वर्ष वयोगटातील संदर्भ सेवेची आवश्यकता असलेल्या सॅममॅम व इतर आजाराबाबत संदर्भ सेवेची आवश्यकता असलेल्या बालकांची आरोग्य तपासणी शिबिर चांडोली ग्रामीण रुग्णालय (खेड) आणि चाकण ग्रामीण रुग्णालय बुधवारी (दि. 9) घेण्यात आले.
चाकण ग्रामीण रुग्णालयात 145 बालकांची तपासणी या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉ.इंद्राणी मिश्रा बाल यांनी तसेच डी. वाय. पाटील महाविद्यालयातील डॉक्टरांच्या पथकातील बालरोगतज्ज्ञ डॉ.संदीप पाटील, बाल रोगतज्ज्ञ डॉ. संपत केदारे, त्वचा रोगतज्ज्ञ डॉ.सोमेश्वर टाके, नेत्र रोगतज्ज्ञ डॉ.कोकाटे, दंत रोग तज्ज्ञ अश्विनी चिंधे यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात 145 बालकांची तपासणी केली.
तर चांडोली येथे बालरोग तज्ज्ञ डॉ. रोहित तायडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. निखील दीप, नाक कान घसा तज्ज्ञ डॉ. आमु, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सतीश खाडे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दिव्या पोलोसे यांनी अगंणवाडीतील 129 बालकांची तपासणी केली.
विविध बालकांना वेळेत उपचारासह, वेळीच ऑपरेशन आदि मज्त्त्वाच्या आरोग्य सोयी-सुविधा देण्यासाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी त्वरीत अमंलबजावणी करण्यासाठी विविध तज्ज्ञ डॉंक्टराच्यो पथकामार्फत तालुकास्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे.
बालकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. गंभीर आजारा संदर्भात आरोग्य सेवेची पुढील उपचाराची आवश्यकता असलेल्या बालकांबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली पुणे येथील डी.वाय पाटील महाविद्यालयात या बालकावर योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत.
– डॉ. बी. बी. गाढवे, वैद्यकीय अधिकारी, खेड तालुका