मंचर -आंबेगाव तालुक्यात नव्याने 17 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या 5 हजार 194 झाली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी रविवार दि. 14 रोजी दिली.
मंचर येथे 3, साकोरे, नांदुर, गावडेवाडी येथे प्रत्येकी 2, लोणी, निरगुडसर, शिनोली, खडकवाडी, कळंब, गिरवली, दरेकरवाडी, धामणी येथे प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत.
आतापर्यंत 4 हजार 907 रुग्ण बरे झाले आहेत. 121 रुग्णांचा मृत्यू झाला असुन 166 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.