जुन्नर – शहरात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संचारबंदी लागू केलेल्या आदेशाची काटेकोरपणे व प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत असून प्रशासनामार्फत उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, आयपीएस अधिकारी ऑंचल दलाल, तहसिलदार हेमंत कोळेकर, नायब तहसिलदार सचिन मुंढे, एपीआय पालवे हे स्वतः कर्तव्यदक्ष दिसून येेत असून प्रसंगी कायद्याचा बडगा देखील दाखवित आहे.
नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, आवश्यक व महत्वाचे कामासाठीच बाहेर यावे असे सांगण्यात आले असून त्याकरिता नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे. संचारबंदी असताना आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना येथील स्थानिक नागरिकांकडून सामाजिक बांधिलकी म्हणून केळींचे वाटप करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर जुन्नरमधील काही नागरिक स्वयंसेवक म्हणून पोलीस प्रशासनास मदत करण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.