पुणे (प्रतिनिधी) – बेकरी उत्पादन आणि पॅकींग फुडला मागणी वाढली आहे. सुरक्षितेतेच्या कारणास्तव पदार्थ घरी नेवून खाण्यास नागरिक पसंती देत आहेत. हॉटेलमध्ये बसून खाण्याची सुविधा नसली, तरीही पार्सलमधुन पदार्थ देण्यात येत आहे. तरीही नागरिकांकडून पॅटीस, केक, पाव, ब्रेड, समोसा, खारी, टोस्ट, सॅंडविच, क्रिमरोल, वेफर्स, भडंग, डायट चिवडा, शेव, बिस्कीटे, पॅकिंगमधील खारे, तिखट शेंगदाणे अशा पदार्थांना मागणी वाढली आहे.
बंद असलेल्या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तुं दुकानांना सुट देण्यात आली होती. त्यावेळी मॅगी, मसालेदार पदार्थ, चीज, बटर पास्ता, फरसाणा, पाणीपुरीची पुरी, मुरमुरे, ड्रायफ्रुट, चॉकलेट, सांभार, बिर्याणी मसाले अशा पदार्थांना मागणी होती. मात्र, आता पॅकींग फुडला मागणी असल्याचे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंग़ुणे यांनी सांगितले.