Pune-Delhi Flight – पुण्याहून (pune delhi flight) 185 प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणाऱ्या आकासा विमानाचे (flight) आज वेगळ्याच कारणामुळे मुंबई विमानतळावर (mumbai airport) आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या बॅगेत बॉम्ब (Bomb threat) असल्याची माहिती दिली होती.
त्यामुळे हे आपत्कालिन लॅंडिंग करण्यात आले. पण त्याची ही माहिती अफवाच ठरली. पुणे विमानतळावरून या विमानाने मध्यरात्री 12 वाजून 7 मिनीटांनी टेकऑफ केल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर उतरावे लागले.
बॉम्बचा दावा फसवा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर आज सकाळी 6 च्या सुमारास विमान पुन्हा दिल्लीकडे रवाना झाले.
आज पहाटे 2.30 च्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने तसेच पोलिसांनी विमानातील प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली.
परंतु पोलिसांना त्यात काहीही आढळले नाही. ही माहिती देणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने आपल्या छातीत दुखत असल्याचा दावा केला त्यानंतर त्याला रूग्णवाहिकेतून नेण्यात आले.
पोलीस क्लिअरन्स मिळाल्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास विमान मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत