मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात शिवसंग्राम (Shivsangram) संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak mete) यांचे 2022 मध्ये अपघाती निधन झाले होते. त्याला वर्ष होत नाही तोपर्यंत मेटे कुटुंबियांवर दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विनायक मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
सचिन मेटे (Sachin Mete) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो 34 वर्षांचा होता. विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा तो मुलगा असून त्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणाने केली याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विनायक मेटे यांच्या जाण्यानंतर मेटे कुटुंबियांवर हा दुसरा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटेने अचानकपणे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस करत आहेत. आत्महत्या करण्यामागे काही राजकीय कारणं आहेत की अन्य काही कारणं याची चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.