Pune Crime | दुचाकीस्वाराला लुटले; चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – दुचाकीवरून निघालेल्या एका व्यक्तीला लाथ मारून चोरट्याने खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. ही घटना मंगळवारी पावने दोनच्या सुमारास जहांगीर रुग्णालयाच्या पार्किंग गेटच्या पुढे घडली.

याप्रकरणी, दिपक नारायण फुलकर (वय 43,रा. शुक्रवारपेठ)  यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारसायकलवरील अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या दुचाकीला जोरात लाथ मारली. फिर्यादी खाली पडले असता, चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

दरम्यान, मागील काही दिवसापासून चोरट्यांनी जबरी चोरीचा सपाटा लावला आहे. कधी चाकूच्या धाकाने तर कधी मारहाण करून पादचारी व एकटे चाललेल्या व्यक्तीला लुटले जाते आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.