मालाड इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले

मुंबई – मुंबईतील मालाड मालवणी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पहिल्याच पावसात मुंबईतील जीर्ण इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इस दुर्घटना के बाद रफी बदहवास हो चुके हैं। पड़ोसी और आसपास के लोग उन्हें दिलासा दे रहे हैं।

ही दुर्घटना मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. यात मोहम्मद रफी यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला. मोहम्मद रफी हे दूध आणण्यासाठी बाहेर गेल्याने बचावले.

मोहम्मद रफी यांच्या कुटुंबातील शफीक मोहम्मद सलीम सिद्दीकी (45), तौसीफ शफीक सिद्दीकी (15), अलीशा शफीक सिद्दीकी (10), आलिफशा शफीक सिद्दीकी (1.5), हसीना शफीक सिद्दीकी (6), इशरत बानो रफी सिद्दीकी (40), रहीशा बानो शफीक सिद्दीकी (40), ताहिस शफीक सिद्दीकी (12), जॉन इर्रानन्न (13)  यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मरने वालों में उनकी तीन मासूम भतीजियां भी शामिल हैं।

दरम्यान, इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.

BMC के कर्मचारी लगातार मलबे के ढेर को हटाने का प्रयास कर रहे हैं।

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.