पुणे – मोक्याच्या गुन्हयात जामिनावर सुटुन जामिन मुदतीत घरफोडी करणा-या अट्टल चोरटयास अवघ्या दोन दिवसांत चंदननगर पोलीसांनी बेडया ठोकल्या. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी ( 45, रा. नं. पाण्याचे टाकी जवळ, मांजरी बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 1 जूलै रोजी चंदननगर पोलीस स्टेशन हददीत तपास पथक हे फोर व्हिलरचा वापर करुन झालेल्या घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेत होत. तेव्हा पोलीस अंमलदार अमित कांबळे व नाणेकर यांना खबर मिळाली की, दोन दिवसांपुर्वी चंदननगर पोलीस स्टेशन हददीत झालेल्या घरफोडीतील एक आरोपी हा मांजरी खुर्द भागात येणार असल्याचे समजले. त्यानूसार सापळा रचुन बातमीमधील वर्णनाचा आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पळून जाताना दिसला. त्याला पाठलाग करुन शिताफिने पकडण्यात आले.
पकडलेल्या अर्जुनसिंगने पापासिंग दयालसिंग दुधाणी व पिल्लूसिंग उर्फ जयसिंग कालूसिंग(रा.दोघही हडपसर यांचेसह दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले. आरोपी अर्जुनसिंग याचे कडुन गुन्हयातील एकुण 27.105 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक चांदिचे विस्कीट असा जप्त करण्यात आले.
तीघेही गुन्हेगार रेकॉर्डवरील असून अर्जुनसिंग याचेवर सन 2003 पासुन पुणे शहर हददीतील वेगवेगळया पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर तळेगाव ढमढेरे येथे यापुर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त नामेदव चव्हाण, उपआयुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त किशोर जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक विवेक सिसाळ, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सचिन कळसाईत,अमित कांबळे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडकर, यांनी केले.