Pune Crime | वाहतूक विभागातील पोलिसाने मागितली साडेतीन लाखाची लाच; ACBकडून गुन्हा दाखल

पुणे, ता. १२ : जाहिरातीचा फलक लावण्यास एनओसी देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने तब्बल तीन लाख ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

उपनिरीक्षक बसवराज धोंडोपा चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. बसवराज हे येरवडा वाहतूक विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहे.

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांनी जाहिरातीचा फलक लावण्यासाठी वाहतूक विभागात अर्ज केला होता. त्यास एनओसी देण्यासाठी बसवराज यांनी तीन लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे लाचेची तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणी विभागाकडून करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने उपनिरीक्षकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.