पुणे – इन्कम टॅक्स अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून ज्वेलर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळवाडी येथे घडली.
याप्रकरणी शशांक पुणेकर (49) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता आरोपी राहूल किरण सराटे (रा. चेंबुर इस्ट, मुंबई ) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक पुणेकर यांचे संभाजीनगरमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. 21 एप्रिलला शशांक यांना इन्कम टॅक्स अधिकारी बोलत असल्याचा एक फोन आला.
त्यावर तुमच्या दुकानाला सील करण्याची ऑर्डर आली असून दुकानाला सील लावण्याची ऑर्डर रद्द करावयाची असल्यास गुगल पेवर 37 हजार 200 रूपये पाठविण्याचे सांगून फसवणूकीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड तपास करीत आहेत.