Pune Crime : हातात शस्त्रास्त्र घेउन व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

गुन्हे शाखेची कारवाई

पुणे – दहशत माजविण्यासाठी हातात शस्त्रास्त्र घेउन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रोहन रमेश घोलप (वय २१, रा. गोखले नगर) आणि अखिल ऊर्फ गणेश विनायक देशमुख (वय ३० रा.  कसबा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध डेक्कन व फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवार, कोयता, चाकू बनविणारे व शस्त्र जवळ बाळगणाऱ्याविरूद्ध गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्यानुसार  आरोपी  रोहन घोलप हातात तलवार घेऊन व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ठेवल्याची माहिती पोलीस अमलदार सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार घोलप तलवार सह झेड ब्रिजवर  थांबल्याचे समजातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

केक कापल्यानंतर सराईताने व्हॉट्सअ‍ॅपवर हातात तलवार घेतल्याचा स्टेटस ठेवल्याची माहिती   पोलिस अमलदार अजय थोरात यांना मिळाली.  त्यानुसार  अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख  याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी श्रीनिवास घाडगे, एसीपी  सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी,  अजय थोरात,  सचिन जाधव, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विजयसिंह वसावे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.