पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी केवळ “कोवॅक्सिन’ डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुधवारी “कोवॅक्सिन’चा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 30 जूनला “कोवॅक्सिन’चा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना बुधवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
“कोवॅक्सिन’ मिळण्याचे केंद्र
स्व. राजीव गांधी रुग्णालय – येरवडा
कै. जयाबाई सुतार दवाखाना – कोथरूड
कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना –
कर्वेनगर
कै. मालती काची दवाखाना – गाडीखाना
कै. दशरथ भानगिरे दवाखाना – महंमदवाडी
ससून सर्वोपचार रुग्णालय