मेष : महिलांना प्रवास घडेल. पण त्यामुळे ताजेतवाने वाटेल. तुमच्यातील धाडसी वृत्ती जागृत होईल.
वृषभ : व्यवसायात महत्वाचे निर्णय घ्याल. कामात सक्रीय पुढाकार राहील. अर्धवट कामे मार्गी लावाल.
मिथुन : नवीन कामे हाती घ्याल. कामाचा वेग वाढेल. नोकरीत वरिष्ठांना व सहकाऱ्यांना तुमचे महत्व कळून येईल.
कर्क : बेकारांना नोकरी मिळेल. कामात मात्र गुप्तता राखा. कुवत ओळखून कामे स्विकारा. यश हमखास मिळेल.
सिंह : महिलांना मोठयांची मते पटणार नाहीत तरी वाद घालू नये. जमा खर्चाचे बजेट कोलमडेल.
कन्या : व्यवसायात कामात विस्तार करण्याचे बेत ठरतील. त्यासाठी आवश्यक ते बदल कराल.
तूळ : आज रोख व उदयाही रोखच हे धोरण विशेष लाभदायी ठरेल. भांडवलाची तरतूद बॅंका व संस्थांमार्फत होईल.
वृश्चिक : नोकरीत वरिष्ठांचा मूड पाहून तुमच्या मागण्या मांडाल. अचानक धनलाभाची शक्यता. कामाचे श्रेय मिळेल.
धनू : महिलांना जुन्या वादाच्या प्रश्नांना तोंड दयावे लागेल. रेंगाळलेली कामे धसास लागतील.
मकर : अनपेक्षित खर्च वाढतील. कामात आलेली मरगळ झटकून मोठया उत्साहाने कामाला लागाल.
कुंभ : नवीन कामे मिळतील. कामाचा वेग वाढल्याने आवश्यक ते बदल कराल. तुमची चिकाटी कामात दिसून येईल.
मीन : आर्थिक स्थिती चांगली राहील. सहकारी कामात मदत करतील. सकारात्मक दृष्टीकोन लाभदायी ठरेल.