पुणे – दिवसभरात 216 नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली. तर, 304 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 5 जण पुण्याबाहेरील आहेत.
आजपर्यंत 4 लाख 86 हजार 71 जण बाधित आढळले. त्यातील 4 लाख 74 हजार 781 जण बरे झाले; परंतु 8 हजार 742 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, बाधितांमधील 2 हजार 548 जण सक्रीय असून, त्यातील 222 जणांची प्रकृती गंभीर असून, 328 बाधित ऑक्सिजनवर आहेत.
स्वॅब टेस्टची संख्या कमी
गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या वाढत होते. त्यामुळे बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून आलेल्या आणि संशयितांच्या स्वॅब टेस्टची संख्या गेल्या काही दिवसांपासून जास्त होती. मात्र ती आता कमी झाली असून मंगळवारी दिवसभरात 5 हजार 884 संशयितांची टेस्ट करण्यात आली, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.