पुणे – करोना संसर्गामुळे कॅनडा आणि युनायटेड किंगडम येथून भारतात येणारी आणि भारतातून या देशांत जाणारी टपाल व्यवस्था अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
मुख्य टपाल कार्यालयातर्फे यासंबंधीचा आदेश काढण्यात आला आहे. सध्या या देशांत जाणाऱ्या विमानसेवाही बंद आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विभागाचे वरिष्ठ पोस्ट मास्तर बी. पी. एरंडे म्हणाले ,” करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवर या दोन्ही ठिकाणी पत्रव्यवहार अनिश्चित काळासाठी बंद राहील. पुढील आदेश आल्यानंतरच पत्रव्यवहार तसेच पार्सल सेवा पूर्ववत होईल.’