नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.
I want to be able to help people through this crisis as best I can because I know what’s it’s like to have a loved one in hospital fighting against COVID. To that end I’ve opened up my DMs for now & will amplify every message requesting/offering help.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 25, 2021
देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातच या वाढत्या करोना रुग्ण संख्येमुळे देशातील वैद्यकीय विभागावर ताण निर्माण झाला असून अनेक राज्यातून ऑक्सिजन, रेमेडीसीवीर आणि वैद्यकीय स्टाफची कमतरता जाणवत आहे. अनेक राज्यांचे मंत्री केंद्र सरकारकडे ऑक्सिजन, रेमेडीसीवीर आणि वैद्यकीय स्टाफची मागनी करत आहे. यातच जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही ट्विटरवरुन मदत मागावी लागली, एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, त्यांनी ट्विट केले आहे की,’मी महामारीच्या परिस्थितीचा अनुभव जवळून घेतला आहे. या संकटाच्या वेळी मी जितके शक्य होईल तितके मदत करण्यास सक्षम होऊ इच्छित आहे. त्यांनी पुढे त्याना मदत मागणाऱ्या युजर्सची मागणी ट्विट करत लिहिले आहे की ,’गौर सिटी नोएडा येथील एका युवकाच्या मामांना इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरची गरज आहे. कोविड पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णासाठी डॉक्टर उपलब्ध होतील का? असा प्रश्न अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन विचारला होता.