पुणे- महापालिकेच्या मुख्य इमारतीसह शहरातील इतर सर्व कार्यालयांत प्रवेशासाठी आता नगरसेवकांनाही ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. तसेच महापालिकेच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षास आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाहीत. आयुक्तांनी नवी सुरक्षा नियमावली लागू केली आहे. त्यानुसार हे आदेश दिले आहेत.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना महापालिका आवारात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली होती. या घटनेनंतर पालिकेतील सुरक्षा नियम आणखी कठोर केले आहेत. त्यानुसार पालिकेतील प्रवेशासाठी सर्वसामान्य नागरिक, नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकारांसाठी
ही नियमावली लागू करण्यात आली आहे.
- अशी आहे नियमावली
- सुट्टीच्या दिवशी संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय कोणासही इमारतीत सोडले जाणार नाही
- सुट्टीच्या दिवशी राजकीय कार्यक्रम घ्यायचा असल्यास पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल
- महापालिकेचे आजी-माजी नगरसेवकांना ओळखपत्र देण्यात येणार
- नागरिकांना पालिकेत प्रवेश करताना फोटो ओळखपत्र बंधनकारक
- गेट पास असल्याशिवाय कोणासही आत सोडले जाणार नाही