पुणे- शहरातील एकही खासगी तसेच महापालिकेच्या एकाही रुग्णालयामध्ये आता करोनाचा एकही रुग्ण दाखल नसून, रुग्णालयेच करोनामुक्त झाल्याचा “फील’ आता शहरात आला आहे. डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णलयात दाखल असलेल्या एकमेव रुग्णाला बुधवारी डिस्चार्ज करण्यात आले. करोनाच्या दोन वर्षाच्या कठीण काळात शहरात पहिल्यांदाच अशी “पॉझिटिव्ह’ स्थिती निर्माण झाली असून, पुणेकरांसाठी ही अत्यानंदाची गोष्ट ठरली आहे.
करोनामुळे खासगी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो रुग्ण दाखल होते. काहींचे जीव गेले; अनेक गंभीर रुग्णांचे जीवही वाचले. करोना लाटेची सुरूवात झाल्यानंतर डॉ. नायडू रुग्णालयाची भूमिका महत्त्वाची ठरली. येथील डॉक्टरांनी रुग्णांचे जीवही वाचवले. कठीण परिस्थितीतूनही या रोगावर उपचार काय हे अद्याप माहिती नसतानाही चाचपडत का होईना, उपचारांना या रुग्णालयात सुरूवात झाली, बव्हंशी ते यशस्वीही झाले.
सद्यस्थितीत नव्याने करोना बाधितांची संख्या कमी झाली आहेच याशिवाय हाताच्या बोटावर मोजण्याइतकी ती उरली आहे. यामुळेच राज्य सरकारनेही उरले सुरले निर्बंध हटवले आहेत. शहरामध्ये 18 एप्रिल 2021 रोजी 56 हजार 650 सर्वाधिक बाधित रुग्ण होते. तर एका दिवसामध्ये 22 जानेवारी 2022 ला 8 हजार 600 रुग्ण आढळून आले होते. आता शहरात केवळ 98 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
शहरातील सर्व
रुग्णालये करोनामुक्त