पुणे-गेल्या 24 तासांत 3 हजार 896 नवे करोना बाधित आढळले असून सक्रिय बाधितांची संख्याही कमी झाली आहे. तसेच, शहरातील 8 जणांचा आणि शहराबाहेरील 6 जणांचा असे एकूण 14 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे.
बाधितांची संख्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे. दिवसभरात 11 हजार 372 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. सक्रीय असलेल्या 31 हजार 133 रुग्णांपैकी 56 बाधितांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, 331 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. 31 जणांना इव्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एकूण सक्रीय बाधितांमधील 4.01 टक्के बाधित रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. आजपर्यंत 9 हजार 236 बाधितांचा मृत्यू झाला आहे.