पुणे – शहरात नवे 444 करोनाबाधित आढळले असून, गंभीर रुग्णांची संख्याही वाढली आहे. याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्याही सुमारे तीनशेने वाढली आहे.
करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत चालला आहे. शहरात दिवसभरात 444 नव्या बाधितांची नोंद झाली. यांचा समावेश करून आजपर्यंत शहरात 5 लाख 11 हजार 585 बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 629 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 120 जणांना डिस्चार्ज मिळाला असून, 6 हजार 573 संशयितांच्या टेस्ट करण्यात आल्या. गेल्या 24 तासांत एका बाधिताचा मृत्यू झाला असून, तोही शहर हद्दीबाहेरील आहे. शहरात आजपर्यंत 9 हजार 118 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय बाधितांची संख्या 2 हजार 838 झाली आहे.