पुणे – शहरात मंगळवारी दिवसभरात करोनाचे नवे 162 बाधित आढळले. तर, 167 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 4 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन पुण्यातील आणि दोन बाधित पुण्याबाहेरील आहेत.
आजपर्यंत 9 हजार 40 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 517 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 191 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 223 जण ऑक्सिजनवर आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढली असून, ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात 6,159 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आल्या.