पुणे : अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कोणालाही पेट्रोल आणि डिझेलची विक्री बंद करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर पेट्रोलची विक्री बंद करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबतचे आदेश काढले. राज्यात संचारबंदी जारी करण्याचे आदेश दिल्यानंतरही पुण्यात नागरिक रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे मोकाट फिरणऱ्यांना पेट्रोलच मिळाले नाही ते ते फिरणार नाही हे गृहीत धरून हे आदेश काढण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या देश महत्त्वाच्या काळातून जात असून विनाकारण लोक घराबाहेर पडले तर त्यामुळे हा प्रसार वाढू शकतो, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.