नवी दिल्ली – देशावरील कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी आज केंद्र सरकारतर्फे आज आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या या निर्णयानुसार आता देशातून सॅनिटायझर्स, कृत्रिम श्वासोश्वासाची यंत्रे, ऑक्सिजन थेरपी यंत्रे अथवा श्वसनासंदर्भातील इतर कोणतीही उपकरणे भारताबाहेर निर्यात करता येणार नाहीत. सरकारचा हा निर्णय या क्षणापासून लागू करण्यात आला आहे.
देशावरील कोरोना विषाणूचे संकट बळावल्यास त्याला अटकाव करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे देशामध्ये उपलब्ध असावीत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Govt of India prohibits export of sanitisers & all ventilators including any artificial respiratory apparatus or oxygen therapy apparatus or any other breathing apparatus, falling under any ITCHS Code (Indian Trade Clarification based on Harmonized System), with immediate effect. pic.twitter.com/wsBbaPQlhc
— ANI (@ANI) March 24, 2020