वाडेबोल्हाईत कोरोना पॉजिटीव्ह सापडलेल्या रुग्णावर गुन्हा दाखल; गावी आल्याची माहिती लपाविल्याने पोलीस पाटलांनी दिली फिर्याद

वाघोली(प्रतिनिधी) : ठाणे येथून वाडेबोल्हाई येथे आलेल्या २९ वर्षीय तरुणाने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असताना तसेच गावी आल्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणे बंधनकारक असताना माहिती दिली नसल्याने कोरोना पॉजिटीव्ह सापडलेल्या या तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाडेबोल्हाईच्या पोलीस पाटील सुषमा चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी कि, ठाणे येथील २९ वर्षीय तरुण त्याच्या पत्नीसह २५ मे रोजी वाडेबोल्हाई येथील बारांगणी वस्ती येथील कुटुंबीयांकडे आला होता. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्याने २६ मे रोजी वाघोली येथील खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट केली असता २७ मे रोजी रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. त्यास तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ठाणे येथून वाडेबोल्हाईत येत असताना प्रवासाची शासकीय परवानगी घेतली नव्हती तसेच वाडेबोल्हाई ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राला माहिती देणे बंधनकारक असताना माहिती दिली नाही. त्यामुळे त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.