पुणे – या वर्षी पावसाळयापूर्वी तसेच पावसाळयातही रस्ते दुरूस्ती केल्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्ड वाढतच आहेत. त्या वेळी महापालिकेकडून वारंवार खर्च करूनही केवळ चांगल्या दर्जाचे काम होत असल्याने रस्ते खड्डेमय होत असल्याने संबधित ठेकेदारांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केली आहे.
तसेच, खड्डयांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात खडी पसरत असून कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहने घसरून अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीनं संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.
याबाबत बोलताना भानगिरे म्हणाले की, महापालिकेकडून मागील वर्षी खड्डे शहरात रस्त्यावर खड्डे असल्याने तब्बल 300 कोटींच्या रस्त्यांच्या निविदा काढल्या आहेत त्याचे जवळपास 50 टक्के काम झाले आहे.
या शिवाय, पावसाळयापूर्वी रस्ते दुरूस्तीसाठी 40 ते 45 कोटींचा खर्च केला आहे. असे असतानाही जुलै महिन्यात झालेल्या पावसाने खड्डे पडले त्याची दुरूस्ती ऑगस्ट महिन्यात झाली तर आता ऑगस्ट महिन्यात झालेल्या रस्ते दुरूस्तीची कामे आता सप्टेंबर महिन्याच्या पावसात खराब झाली आहेत.
परिणामी, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे महापालिकेने ठेकेदारांसह सर्व संबधितांवर तातडीनं कारवाई करून रस्ते दुरूस्त करावेत तसेच खड्डयामुळे वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी तातडीनं उपाय योजना कराव्यात अशी मागणी आयुक्ताकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.