Eknath Shinde – शिवछत्रपतींची (chhatrapati shivaji maharaj) ही वाघनखं (Tiger Khan) आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण असलेली “वाघनखं’ ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार मंगळवारी लंडन येथे करण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक-पुरातत्व आणि संग्रहालय तेजस गर्गे हे यावेळी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, सर्व शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्र आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्धापनदिनाचा सोहळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला.
याच वर्षात आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही “वाघनखं’ नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.