पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शनिवारी 197 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोविशिल्डचे 186 केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोव्हॅक्सीनचे 11 केंद्रावर प्रत्येकी 500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
26 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना शनिवारी जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकिंग 35 टक्के तर 35 टक्के ऑन दि स्पॉट बुकिंग होणार आहे. 21 ऑगस्टला कोव्हॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना शनिवारी 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 35 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे.