पिंपरी – 61 केंद्रांवर मिळणार कोविशिल्ड

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आज (दि. 18) शहरातील 62 केंद्रांवर कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर 9 केंद्रांवर कोव्हॅक्‍सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.

शनिवारी (दि. 18) शहरातील 18 ते 44 वर्ष व 45 वर्षांवरील नागरिकांना 61 केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. त्यापैकी 10 केंद्रावर 500 डोस उपलब्ध आहेत. तर उर्वरित सर्व केंद्रांवर प्रत्येकी 400 डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 5 लाभार्थी हे ऑनलाइन स्लॉट बुकींग केलेले तर 20 किऑस्क टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.

तसेच उर्वरित नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍपनुसार लस दिली जाणार आहे. या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच इतर नऊ केंद्रावर कोव्हॅक्‍सिन लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर प्रत्येकी 350 डोस उपलब्ध आहेत. सर्व केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले
जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.