पुणे- भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या पती व भावाकडून एका सोसायटीच्या अध्यक्षास बेदम मारहाण करण्यात आली.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/5511721382231413
सोसायटीची सिमा भिंत स्मार्ट सिटीच्या कामासाठी पाडली गेली. ती पाडू नये यासाठी नगरसेवकाने कोणतेही सहकार्य सोसायटीला केले नाही. ही भिंत पाडल्यानंतर संबंधीत सोसायटीच्या अध्यक्ष संजीव सिंदकीकर यांनी सोसायटीमध्ये नगरसेविकेविरोधात पत्रके वाटली होती. त्याचा राग मनात धरुन नगरसेविकेचा पती ऍड. मधुकर मुसळे व भाऊ मयुर मुंडे यांनी संजीव यांना सोसायटीच्या आवारातच बेदम मारहाण केली.