मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण मंदिर बेदीच्या पतीचे काल निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि ते कायम एकमेकांसोबतच दिसून येत होते. पतीच्या जाण्याने मंदिरा अगदी कोलमडून गेली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी हिने राज कौशल यांच्या अंतिम क्षणी सुद्धा त्यांची साथ सोडली नाही.
View this post on Instagram
अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत अभिनेत्री मंदिरा बेदी हिने तिच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी पतीला अखेरचा निरोप देताना ती स्वतःला सावरू शकली नाही आणि हुंदके देत तिला रडू कोसळलं.
View this post on Instagram
त्याच पार्थिव उचलताना मंदिराची खूप वाईट अवस्था झाली होती. पती राज कौशलवर अंत्यसंस्कार करत असल्याचे मंदिराचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशलवर व्हायरल होत आहे. नेटकरी देखील तिच्या या धाडसाला सलाम करत आहेत.
View this post on Instagram
राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे.
तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.