पुणे : जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची निवडणूक ३१ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. दादाभाऊ बबनराव शेटे यांची निवड झाली आहे.
तर उपनिवडणूक अधिकारी म्हणून अॅड. कल्याण शिंदे आणि अॅड. योगेश देशमुख काम पाहणार असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे यांनी दिली.
शेटे 1992 पासून वकिली करीत आहेत. 2008 सालापासून नोटरी म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांनी पुणे लाॉयर्स कन्झ्य्मर्स को़- अॉपरेटीव्ह सोसायटीच्या विविध पदावर काम केले आहे. ते सोसायटीचे दोन वर्षे अध्यक्ष होते.
तर सोसायटीचे सचिव व सहसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तर शिंदे हे सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. तर, आगामी पुणे बार असोसिएशनची निवडणूक पुर्णपणे पारदर्शी असेल, असे निवडीनंतर अॅड. शेटे यांनी सांगितले