पुणे – ‘जीआयएस मॅपिंग’मध्ये आणखी एक भ्रष्टाचार?

विभागप्रमुखांच्या बनावट स्वाक्षरींसह, लॉग-इन आयडीचा गैरवापर झाल्याचा आरोप

पुणे – महापालिकेच्या हद्दीत नव्याने करदाते रजिस्टर करण्यासाठी ज्या दोन कंपन्यांना कामे दिली होती, त्यांना काम न करताच बिले अदा करण्यात आली आहे. हे प्रकरण अगदी ताजेच आहे, परंतु थेट विभागप्रमुखांची बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या लॉग-इन आयडीचा गैरवापर झाल्याचे पुढे आले आहे. ही गंभीर बाब असून, या प्रकरणात फौजदारी दाखल करणार असल्याचे आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

“मे. सायबरटेक सिस्टिम ऍण्ड हार्डवेअर प्रा. लि.’ आणि “मे सार आय टी रिसोर्सेस प्रा. लि’ या दोन कंपन्यांना जीआयएस मॅपींगचे काम देण्यात आले आहे. मात्र त्यांनी निम्मे कामही केले नाही. आणि जे काम केले आहे तेही अर्धवट करण्यात आल्याचा अहवाल शासनपुरस्कृत “बेंचमार्क सोल्यूशन्स’ या कंपनीने दिले आहे. असे असतानाही या कंपनीला त्यांची बिले अदा करण्यात आली आहेत. आता त्यावर कडी म्हणजे, ज्या कंपन्यांना हे काम देण्यात आले होते, त्यांनी थेट करआकारणी-करसंकलन विभाग प्रमुखांच्याच बनावट स्वाक्षरी केल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या इ-मेलचाही गैरवापर केला आहे. कोथरूड आणि वारजे या भागातील प्रकरणे आता समोर आली आहेत, आणखी अशी किती प्रकरणे असतील? याचा विचार न केलेलाच बरा,’ असे शिंदे म्हणाले.

मिळकत तपासणी केल्यानंतर त्याचा तपशील भरल्यानंतर खातरजमा करून त्यावर विभागप्रमुखांची स्वाक्षरी होणे ही प्रक्रिया आहे. मात्र आधी खातेप्रमुखांची स्वाक्षरी त्यानंतर अर्ज इमेलवरून डाऊनलोड केला आणि त्यानंतर तो भरला, असा उलटा प्रवास कागदपत्रांवरील तारखांवरून दिसून येतो. त्यामुळे गैरप्रकार झाल्याचे यावरून सिद्ध होतेच परंतु यामध्ये जे साईट इन्स्पेक्‍स्टर आणि डिव्हीजनल इन्स्पेक्‍टर कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाई होणे आवश्‍यक आहे असे शिंदे यांचे म्हणणे आहे.

जर या आणि अन्य विषयासंदर्भात महापालिकेकडे, आयुक्तांकडे तक्रार करून काहीच उपयोग होत नाही. ते पत्रांना उतत्रही देत नाहीत, चौकशीही करत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने पोलीसांत आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

…मग अजून पोलीस तक्रार का नाही?

खोट्या स्वाक्षरीबद्दल आणि लॉग-इन आयडीच्या वापराबाबत स्वत:च्या खात्यातील लिपीक राम शिंदे यांनाही खुलासा करावा, असे पत्र विभागप्रमुख विलास कानडे यांनी दिले होते. शिंदे यांनी स्वाक्षरी बनावट असल्याचे आणि लॉग-इन आयडीचा गैरवापर झाल्याचे उत्तर कानडे यांना दिले आहे. असे असतानाही कानडे यांनी अद्याप या संदर्भात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली नसल्याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे शिंदे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)