राजीवकुमार यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मागणी 

नवी दिल्ली – शारदा चिटफंड प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून सात दिवसांचे संरक्षण दिले आहे. ते वाढवून मिळावे यासाठी एका विशेष बेंचचे नियुक्त करण्या यावा अशी मागणी राजीवकुमार यांनी  सर्वोच्च न्यायालयात केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली असून राजीवकुमार यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राजीवकुमार यांना सात दिवसांची सवलत देऊन त्या अवधीत संबंधीत कोर्टात जाऊन जामीन मिळवण्यास अनुमती दिली होती. १७ मे रोजी ही अनुमती देण्यात आली असली तरी कोलकात्यातील कोर्टांमध्ये सध्या संप सुरू असल्याने त्यांचे कामकाज होत नाही. त्यामुळे सात दिवसांच्या अटकेपासूनच्या संरक्षण अवधीत वाढ केली जावी अशी मागणी त्यांच्या वकिलांच्या वतीने खंडपीठाकडे करण्यात आली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here