विश्रांतवाडी : कॉंग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात आंदोलन करताना रेखा टिंगरे यांच्यासह भाजप पदाधिकारी.
विश्रांतवाडी – तब्बल ३०० कोटी रुपये काळा पैसा साठवून ठेवलेल्या काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात पुणे शहर भाजपने आंदोलन केले. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.
विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पुणे शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, उपाध्यक्षा कविता मुडेकर, आरती साठे, प्रिती काकडे, पूजा टिळेकर, शरयु परब, शामा जाधव, उज्वला गौड, रितू नाईक, प्रगती अकिम, सविता कदम, अश्विनी भाडळे , तसेच भाजप वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ योजना प्रमुख अतुल वैराट, चंद्रकांत जंजीरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस विरोधी घोषणाबाजी केली. सूत्रसंचालन चंद्रकांत टिगरे यांनी केले.