– देवेंद्रशेठ शहा : मंचर येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
मंचर – मंचर दिवाळी उत्सव गेल्या चार वर्षापासून साजरा केला जात असून या माध्यमातून लहानांपासून जेष्ठापर्यंत अनेकांच्या कलागुणांना वाव मिळत आहे, त्यामुळे या उत्सवाची अनेकजण वाट पाहत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असे गौरोद्गार मंचर येथील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी व्यक्त केले .
मंचर (ता. आंबेगाव) येथील देवेंद्रशेठ शहा फाउंडेशन, रजनी प्रकाश फाउंडेशन, राष्ट्रवादी काँगेस पक्ष मंचर यांच्या वतीने मंचर दिवाळी उत्सवात स्मार्ट परिवार, स्मार्ट सुनबाई, कुमारिका आणि कन्या गट वेशभूषा, किल्ले आणि रांगोळी स्पर्धेतील सहभागी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या युवा नेते पूर्वा वळसे पाटील, उद्योजक पारस शहा, चंद्रशेखर लायगुडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, राष्ट्रवादीचे मंचर शहर अध्यक्ष सुहास बाणखेले, दत्ता थोरात, लक्ष्मण थोरात, बाजीराव मोरडे, जगदीश घिसे, प्रवीण मोरडे, विकास बाणखेले, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, सुषमा शिंदे यांसह पक्षाचे व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पूर्वताई वळसे पाटील म्हणाल्या, आंबेगाव तालुक्यातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी देवेंद्र शहा यांनी हक्काचे व्यासपीठ तयार केले असून, त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाची व्यवस्था सानिका कालेकर, समीर घेवडे, भूषण थोरात आदी मान्यवरांनी पाहिली. प्रास्ताविक सुहास बाणखेले, सूत्रसंचालन तनुजा पोखरकर ,तन्मय चिखले यांनी केले, तर दत्ता थोरात यांनी आभार मानले.
विजेते -किल्ले स्पर्धा पहिला क्रमाक टायटन ग्रुप , दुसरा क्रमाक द्वारका ग्रुप ,तिसरा क्रमांक स्वामी माऊली ग्रुप, रांगोळी स्पर्धा पहिला क्रमांक सायली काळे, दुसरा क्रमाक केतकी गोमसे, तिसरा क्रमाक समृद्धी बाणखेले , वेशभूषा कन्या स्पर्धा पहिला क्रमाक श्रेया निऱ्हाळी , दुसरा क्रमाक आराध्या राऊत ,तिसरा क्रमाक अथर्व डावखरे, वेशभूषा कुमारी पहिला क्रमाक ईश्वरी बाणखेले , दुसरा क्रमाक यक्षाली जोशी, तिसरा क्रमाक सान्वी पोखरकर ,वेशभूषा सुनबाई पहिला क्रमाक वर्षा लोखंडे, दुसरा क्रमाक जागृती महाजन, तिसरा क्रमाक काजल डावखरे ,वेशभूषा परिवार पहिला क्रमाक सोमनाथ राऊत व परिवार ,दुसरा क्रमाक जालिंदर शिंदे ,तिसरा क्रमाक सोनाली काळे.