नारायणगाव – वारुळवाडीतील ठाकरवाडी (नारायणगाव, ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अर्थसंपदा पतसंस्थेकडून स्वेटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहेत्रे, उपाध्यक्ष विलास पानसरे, संचालक प्रकाश नेहरकर, राजेंद्र खिलारी, हिराबाई शेटे, शरद शिंदे, मंगेश मेहेर, उत्तम मेहेत्रे, निलेश रसाळ, निलेश कोल्हे, केंद्रप्रमुख दिनेश मेहेर, श्रीकांत फुलसुंदर, सचिन सोनगरे, सुरेखा बेनके, अंजली खैरे, स्वाती बढे, कविता मंचरे, अनंत भोर, सोमनाथ मेहेत्रे, सचिन भोर, गणेश नांगरे, अभिषेक कोरहाळे, नितीन काळे व शिक्षक उपस्थित होते.
रमेश मेहेत्रे म्हणाले की, सध्या थंडीचे दिवस असल्याने मुलांचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात शाळेला व विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प केला आहे.
शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून गरजेनुसार वह्या, क्रीडा साहित्य, कंपास पेटी आदी शालेय साहित्याचे वाटप करणार आहे. केंद्रप्रमुख दिनेश मेहेर यांनी अर्थसंपदा पतसंस्था अनेक वर्षे शाळेला मदत करून सामाजिक कामात पुढे असल्याचे सांगितले.