पुणे – भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याला दूरवर फरफटत नेले. त्यामुळे अपघातात त्यांच्या सोबत असलेल्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात ३० ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उंड्रीतील कडनगरमध्ये झाला.
जैद मोसीन मुजावर (वय तीन) वर्षे असे ठार झालेल्याचे नाव आहे. मोसीन आणि रेश्मा मुजावर (रा. जुनी सांगवी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोटार चालकाविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसीन आणि त्यांची रेश्मा व मुलगा जैद जुनी सांगवीहून उंड्रीत दुचाकीवरून आले होते. त्यावेळी कडनगर परिसरात भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे मोसीनला दूरवर फरफटत नेले. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे मोसीन यांचा मुलगा जैद ठार झाला. तर मोसीन आणि त्यांच्या पत्नी रेश्माला दुखापत झाली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी दिली आहे .